पुजारा, विहारीसह कोचिंग स्टाफ यूएईला रवाना होणार, ऑस्ट्रेलियन दौऱ्याची तयारी

हिंदुस्थानी क्रिकेट संघातील बहुतांशी क्रिकेटपटू यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौऱयासाठी यूएईमधूनच टीम इंडियाचा संघ रवाना होणार आहे. मात्र चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी हे कसोटीतील स्पेशालिस्ट आयपीएलमध्ये खेळत नाही आहेत. त्यामुळे दोघांसह इतर सपोर्ट स्टाफ यूएईला रवाना होणार असून आयपीएल संपल्यानंतर हिंदुस्थानचा संपूर्ण संघ एकत्रितपणे यूएईतून ऑस्ट्रेलियन दौऱयावर जाईल.

चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी या दोन फलंदाजांसह फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर हे पुढच्या रविवारी यूएईला रवाना होतील, अशी माहिती एका क्रीडा वेबसाईटमधून प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr सोमवारी यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे.

आगामी दिवसांमध्ये संघ निवडणार

हिंदुस्थानचा संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. पण अद्याप बीसीसीआयकडून संघाची निवड करण्यात आलेली नाही. यावर सूत्रांकडून सांगण्यात आले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकावर बीसीसीआयकडून अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्यामुळे संघनिवडीला विलंब होत आहे. पण आगामी दिवसांमध्ये ही निवड केली जाईल. तिन्ही प्रकारांसाठी जम्बो संघ निवडला जाणार आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

आयपीएलमधील बायो बबलमध्ये राहणार नाही

चेतेश्वर पुजारा व हनुमा विहारी यांच्यासह सपोर्ट स्टाफला यूएईमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. पण आयपीएल बायो बबलमध्ये त्यांना ठेवण्यात येणार नाही.

हिंदुस्थानातून जाणाऱया सर्वांसाठीच वेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. सहा दिवस क्वारंटाईनमध्ये या सर्वांना रहावे लागणार आहे. तसेच सातत्याने कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या