हिंदुस्थानचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये; पहिला दिवस न्यूझीलंडचा

377

ट्वेंटी-20 मालिका 5-0 अशा फरकाने दिमाखात जिंकणाऱया हिंदुस्थानी क्रिकेट संघाला वन डे मालिकेत 3-0 अशा फरकाने सपाटून मार खावा लागला. हिंदुस्थान व न्यूझीलंड यांनी प्रत्येकी एक मालिका जिंकल्यामुळे कसोटी मालिका रंगतदार होणार याचे संकेत मिळाले. मात्र वेलिंग्टन येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी यजमान न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. हिंदुस्थानचे फलंदाज एकामागोमाग एक असे अपयशी ठरत असतानाच उपकर्णधार अजिंक्य रहाणे (38 धावा) याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आता मराठमोळा अजिंक्य रहाणे रिषभ पंत (10 धावा) याच्यासोबत खेळपट्टीवर उभा असून पाहुण्या संघाने 5 बाद 122 धावा केल्या आहेत. पावसाच्या व्यत्ययामुळे 55 षटकांचाच खेळ होऊ शकला.

आपली प्रतिक्रिया द्या