पृथ्वी शॉचे वन डेत पदार्पण, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

108

पहिल्या कसोटीत धडाकेबाज शतक ठोकणाऱया मुंबईकर पृथ्वी शॉला आता हिंदुस्थानच्या वन डे संघातही स्थान देण्यात आले आहे. अखिल हिंदुस्थानी सीनियर निवड समितीने मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची निवड केली. यामध्ये पृथ्वी शॉसह उपकर्णधार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर या पाच मुंबईकरांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या केदार जाधवचेही संघातील स्थान कायम ठेवण्यात आले आहे.

शिखर धवनच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याने आगामी टी-20 व वन डे मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्याऐवजी हिंदुस्थानी टी-20संघात संजू सॅमसनची तर वन डे संघात पृथ्वी शॉची निवड करण्यात आली आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारपदाची सूत्रे विराट कोहलीकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपविण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या