हिंदुस्थानचे वर्चस्व: पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर

257
Pune: Indian cricket team player Ravindra Jadeja plays a shot during the day two of second India-South Africa cricket test match at Maharashtra Cricket Association Stadium in Pune, Friday, Oct. 11, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad)(PTI10_11_2019_000136B)

पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर यजमान हिंदुस्थानचा संघ पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फ्रंटफूटवर उभा आहे. कर्णधार विराट कोहलीची विक्रमी द्विशतकी खेळी… उपकर्णधार अजिंक्य रहाणे व अष्टपैलू रवींद्र जाडेजा यांची शानदार अर्धशतके… अन् उमेश यादव व मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर हिंदुस्थानने शुक्रवारचा दिवस गाजवला. हिंदुस्थानने पहिला डाव 5 बाद 601 या धावसंख्येवर सोडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची अवस्था 3 बाद 36 धावा अशी झाली. आता पाहुणा संघ 565 धावांनी पिछाडीवर आहे.

जाडेजाचे 12वे अर्धशतक

अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर रवींद्र जाडेजा खेळपट्टीवर आला. या लढतीत हिंदुस्थानने पाच गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हनुमा विहारीला बाहेर बसवण्यात आले आहे. त्यामुळे यष्टिरक्षक रिद्धिमान साहासह रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली. रवींद्र जाडेजाने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत 91 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याने कर्णधारासोबत 225 धावांची भागीदारीही रचली. रवींद्र जाडेजाने आपल्या खेळीत दोन षटकार व आठ चौकारांची आतषबाजी केली. हे त्याचे बारावे अर्धशतक ठरले. सेनुरॅन मुथुसामी याने त्याला बाद केले.

  • z विराट कोहलीने 336 चेंडूंत दोन षटकार व 33 चौकारांसह नाबाद 254 धावांची संस्मरणीय खेळी केली. हे त्याचे 26वे कसोटी शतक ठरले. तसेच त्याने सातव्या द्विशतकालाही गवसणी घातली. दोनशे धावांनंतर सेनुरॅम मुथुसामीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला होता. पण तो चेंडू नोबॉल असल्यामुळे विराट कोहलीला जीवदान मिळाले.

एल्गार, मार्करम, बवुमा अपयशी

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. उमेश यादवने दुसऱयाच षटकातील दुसऱयाच चेंडूवर एडन मार्करमला शून्यावर पायचीत पकडले. त्यानंतर उमेश यादवनेच डीन एल्गारचा सहा धावांवर त्रिफळा उडवला. तेम्बा बवुमाला मोहम्मद शमीने आठ धावांवर बाद केले. आता थ्युनिस दी ब्रुन 20 धावांवर, तर एनरीक नॉर्थजे दोन धावांवर खेळत आहे

आपली प्रतिक्रिया द्या