ऑस्ट्रेलियाचे मालिकेत निर्भेळ यश

344
Adelaide: Australia's Nathan Lyon celebrates the wicket of Pakistan's Yasir Shah during their cricket test match in Adelaide, Monday, Dec. 2, 2019. AP/PTI(AP12_2_2019_000100B)

यजमान ऑस्ट्रेलियाने सोमवारी पाकिस्तानचा दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्याच दिवशी एक डाव 48 धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश संपादन केले. पाकिस्तानला सलग दुसऱया कसोटीत डावाने पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. नाबाद त्रिशतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर सामनावीर ठरला, तर मालिकावीराचा बहुमानही त्यालाच मिळाला.

ऑस्ट्रेलियाने 3 बाद 589 धावसंख्येवर डाव घोषित करून पाकिस्तानला 94.4 षटकांत 302 धावसंख्येवर रोखून पहिल्या डावात 287 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने फॉलोऑन लादून पाहुण्यांची दुसऱया डावातही आघाडीची फळी कापून काढली. पाकिस्तानने तिसऱया दिवसाच्या 3 बाद 39 धावसंख्येवरून सोमवारी पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर त्यांचा दुसरा डाव 82 षटकांत 239 धावांत संपुष्टात आला. सलामीवीर शान मसूद (68), असद शफिक (57), मोहम्मद रिझवान (47) व इफ्तिखार अहमद (27) यांनीच काय तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा प्रतिकार केला. नाथन लॉयनने 5 फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 3 बाद 589 धावा (घोषित)
  • पाकिस्तान पहिला डाव –  94.4 षटकांत 302 धावा
  • पाकिस्तान दुसरा डाव 82 षटकांत 239 धावा
आपली प्रतिक्रिया द्या