क्रिकेटपटू ते अध्यात्माचा प्रवास

624

महाराष्ट्राच्या क्रिकेट संघामधून 1987 ते 2001 या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी… कमीत कमी 50 प्रथम श्रेणी डाव खेळून 63.10ची फलंदाजी सरासरी असणारे एकमेव नॉन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू… हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघामधून नेत्रदीपक कामगिरी करणारे… ही सक्सेसफुल स्टोरी पुण्याच्या शंतनू सुगवेकर यांची. याप्रसंगी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी असलेल्या शंतनू सुगवेकर यांचा अध्यात्मावरही तेवढाच विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर यूटय़ूब वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी क्रिकेटपटू ते अध्यात्म प्रवासाबद्दल रहस्य उलगडले.

फक्त गुरुवारी आरती करतो

साईबाबा मला पदोपदी मार्गदर्शन करतात. आमच्या दोघांमधील प्रेम विनाअटीचे आहे. मी तुमच्यासाठी हे करतो, तर तुम्ही माझ्यासाठी हे करा असे मी केव्हाही म्हणत नाही किंवा ते जेव्हा मला मार्गदर्शन करतात, तेव्हा ती बाब मी करायलाच हवी असा आग्रहही ते धरत नाहीत. पटलं तर कर असे ते सांगतात. माझा विश्वास त्यांच्यावर आहे. म्हणून मी दर गुरुवारी आरती करतो, इतर दिवशी माझे आयुष्य जगत असतो, असे शंतनू सुगवेकर सांगतात.

‘त्यामुळे’ दिशा मिळालीय

अध्यात्माकडे वळल्यानंतर मला दिशा मिळू लागली. मला कसं जायचंय… कुठे जायचंय… का जायचंय याबाबत निश्चितपणे समजू लागले आहे. तसेच अध्यात्मावर काळाचा प्रभाव पडणार नाही. अनेक वर्षांपासून हे चालत आलेय. यापुढेही ते सुरूच राहील, असे शंतनू सुगवेकर यावेळी आवर्जून म्हणाले.

साईबाबांचे 2007 साली पहिल्यांदा दर्शन

2006 सालामध्ये एक स्वप्न पडले. त्यावेळी गजाजन महाराज स्वप्नात आले. त्यांचे पाय धरले असता ते म्हणाले, ‘‘अरे, तुझा गुरू मी नाही. एक वर्षानंतर तुला तुझे गुरू भेटतील. त्यानंतर बरोबर एक वर्षानंतर मी मित्रांसोबत गप्पा मारत असताना एक म्हातारा माणूस माझ्याकडे जेवणासाठी पैसे मागू लागला. त्याला मी शंभर रुपये दिले. मग आम्ही मित्र पुढे गेलो. या घटनेबद्दल मित्राला विचारले, त्या माणसाचे डोळे किती गोंडस होते ना! त्यावेळी मित्र म्हणाला, कोणता म्हातारा. मला तर दिसला नाही. मित्र असे म्हटल्यानंतर पाकिटामधील पैशांवर लक्ष दिले, पण त्यामधील 100 रुपये कमी झाले होते. त्यानंतर मी मागे वळून बघितले. तो माणूस माझ्याकडे बघू लागला. तो चक्क साईबाबांच्या रूपात मला दिसला. तेथून माझे साईबाबांवरील प्रेम वाढू लागले, असे शंतनू सुगवेकर यावेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या