‘राहुल द्रविड’ने नाकारली टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची ऑफर, जाणून घ्या काय आहे कारण…

टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या नंतर टीम इंडियाचा हेड कोच कोण होणार? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास बीसीसीआयने सुरुवात केली आहे. सध्या हेड कोच असलेले रवी शास्त्री आपले पद सोडणार आहेत. त्यांच्याजागी नवीन कोचचा शोध सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने राहुल द्रविड याला टीम इंडियाचा हेड कोच पद स्वीकारण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याने बीसीसीआयची ही ऑफर नाकारली आहे.

हेड कोच बनण्याची ऑफर का नाकारली?

या ऑफरला नकार देताना राहुल द्रविड याने बीसीसीआयला यामागचे कारण देखील सांगितले आहे. राहुल द्रविड म्हणाला आहे की, त्याला कनिष्ठ स्तरावरील क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याला भविष्यासाठी युवा खेळाडू तयार करायचे आहेत.

दरम्यान, राहुल द्रविड नुकताच टीम इंडियासोबत हेड कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. जिथे टीम इंडिया टी -20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. राहुल द्रविड हेड कोच म्हणून श्रीलंकेला जाताच तो भविष्यात टीम इंडियाचा पूर्णवेळ हेड कोच बनू शकतो असे वाटू लागले होते. मात्र हे घडले नाही आणि त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहणे पसंत केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या