117 दिवसांनंतर क्रिकेटचे ‘पुनश्च हरिओम’, खेळाडूंना सेलिब्रेशन करता येणार नाही

536

तब्बल 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजला भिडणार आहे. ज्यो रुटच्या अनुपस्थितीत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या खांद्यावर असणार आहे.

जेसन होल्डर वेस्ट इंडीज संघाचे नेतृत्व करील. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. यावेळी गोलंदाजांना चेंडूला लाळ किंवा थुंकी लावता येणार नाही. चेंडूला वारंवार सॅनिटाइज करावे लागणार आहे. खेळाडूंना मैदानात सेलिब्रेशनही करता येणार नाही. एवढेच नव्हे, तर दोन्ही संघांतील खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर मैदानात उतरणार आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळले जाणार आहे.

चेंडूही साफ करणार
ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी चेंडूमुळे कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असल्याची भीती क्यक्त केली होती. मात्र, इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडन व स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिटय़ूटच्या रिपोर्टद्वारे चेंडूमुळे कोरोनाचे संक्रमण होणार नाही, असे सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार चेंडूला संक्रमित कपड्याने साफ केल्यानंतर 30 सेकंदांनंतरही चेंडूवर व्हायरस मिळणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या