श्रीलंकेच्या मथीशाचा पराक्रम, ही गोलंदाजी आहे की तुफान

792

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये रविवारी एक मोठी घटना घडली. श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथिराना याने हिंदुस्थानच्या यशस्वी जैसवालला टाकलेला एक चेंडू 175 किलोमीटर प्रतितास वेगाने टाकला. मात्र हा चेंडू खरोखरच विक्रमी वेगात टाकला की स्पीडोमीटरमध्ये काही गडबड झाली याबाबत अद्याप काही कळू शकलेले नाही. आयसीसीकडूनही विक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

मथीशा पथिरानाने टाकलेला हा चेंडू यशस्वीच्या लेग साइडने निघून मागे गेला. अंपायरने तो वाइड असल्याचा निर्णय दिला. यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर जेव्हा बॉलचा स्पीड दाखवला तेव्हा सर्वच जण हैराण झाले.

आपली प्रतिक्रिया द्या