
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणात एक नव्हे, तर दोन आरोपी असल्याचे समोर आले आहे. अभिषेकसोबत त्याच्या एका मित्रावरही आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिन्सुरा जिल्हा न्यायालयाने पोरेलचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वैद्यकीय विद्यार्थिनीने अभिषेकवर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक संबंध ठेवत फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्या विद्यार्थिनीने असाही आरोप केला की, ते एकत्र परदेशात गेले होते, पण पोरेलने नंतर त्यांचे संबंध नाकारले. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्प साधला. तक्रारीनुसार सुमारे दीड वर्षापूर्वी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले, पण त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.





























































