
भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी जेष्ठाचा मृत्यू झाला. हा अपघात 7 फेब्रुवारीला सकाळी दहाच्या सुमारास हडपसरमधील मांजरी पार्क परिसरात घडला. याप्रकरणी पसार मोटार चालकाविरूद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौस मोइद्दीन मेहबुबसाब मुजावर (वय 72 रा. लोणी काळभोर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोहेल पठाण वय 25 यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रपाळी काम संपवून गौस हे रस्त्याने पायी चालले होते. मांजरी पार्क परिसरात रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गौस हे गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव तपास करीत आहेत.