जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण, पोलीस अधिकारी भावाला केले अटक

गायक जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणाला नवे वळण आले आहे. सीआयडीने जुबिन गर्गचा चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक केली आहे. संदीपन गर्ग हे आसाम पोलीस सेवेत अधिकारी आहेत. ज्यावेळी जुबिन याच्यासोबत ही घटना घडली त्यावेळी त्याच्यासोबत ते होते. सीआयडीने आतापर्यंत पाच लोकांना या प्रकरणात अटक केली आहे.

संदीपन गर्ग यांच्या अटकेबाबत बोलताना एसआयटी प्रमुख आणि विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, आसाम पोलिसांच्या एसआयाटी सीआयडीने जुबिन गर्ग याचा मृत्यू प्रकरणी एपीएस अधिकारी संदीपन गर्ग यांना अटक केली आहे.

जुबिन गर्ग याच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी कसून तपास करत आहे. सीआयडीने आतापर्यंत या प्रकरणात पाच लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये कार्यक्रम आयोजक श्यामकनु महंत, जुबिनचे प्रबंधक सिद्धार्थ शर्मा, बॅण्डमेट शेखर ज्योती गोस्वामी, सह-गायक अमृतप्रवा महंत आणि आता त्याचा भाऊ एपीएस अधिकारी संगीपन गर्ग सहभागी आहेत.