
मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 9 वर्ष प्रेमसंबंधात राहिल्यानंतर दोघांनी मिळून लग्न केलं. लग्न होऊन दोन महिने झाले आणि दोनच महिन्यात कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीने पतीला संपवलं. उत्तर प्रदेशालीत बरेली जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झालं आहे. 33 वर्षीय जितेंद्र कुमार यादव गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याच घरामध्ये आढळून आला.
बरेली जिल्ह्यातील इज्जतनगर भागामध्ये जितेंद्र कुमार यादव आणि त्याची पत्नी ज्योती भाड्याच्या घरामध्ये राहत होते. 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा विवाह झाला होता. विद्यार्थी जीवनापासून ते दोघं एकत्र होते. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने लग्नसोहळा थाटामाटात पार पडला होता. लग्न झाल्यानंतर आठवड्यातच दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू झाले. जितेंद्र ज्योतीच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढले आणि ऑनलाईन जुगारामध्ये घालवले. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली आणि त्यानंतर ज्योतीने आपल्या आई-वडिलांसह भावाला याची माहिती देत त्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर तिघांनी मिळून जितेंद्रला खून केला आणि त्याने आत्महत्या केल्याच भासवण्याचा प्रयत्न केला.
ज्योतीचे वडील कालीचरण, आई चमेली आणि भाऊ दिपक यांनी मिळून जितेंद्रचा खून केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. ज्योतीने दिपकचा गळा दाबून त्याला संपवलं. याप्रकरणी जितेंद्रचा भाऊ अजय कुमारने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ज्योती आणि इतर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.





























































