गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसरा! उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3 लाख गुन्हय़ांची नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

देशात महिलांवरील अत्याचारासह इतर गुन्हय़ांमध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक गुन्हय़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, केरळ आणि दिल्लीत गुन्हे वाढले आहेत. दरम्यान, 2017मध्ये देशभरात एकूण 30 लाख 62 हजार 569 गुन्हय़ांची नोंद झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) अहवाल जाहीर केला. 2015, 2016 आणि 2017 या तीन वर्षातील नोंद झालेल्या गुन्हय़ांची माहिती देण्यात आली आहे.

गुन्हय़ांमध्ये वाढ

  • देशात 2015 मध्ये 2949400 गुन्हय़ांची नोंद झाली, 2016 मध्ये 2975711 तर 2017 ला 3062579 गुन्हे नोंदविले गेले.
  • उत्तरप्रदेश-2015- 241920 गुन्हय़ांची नोंद, 2016 -282171 गुन्हे, 2017 – 310084 गुन्हे, देशातील 10.1 टक्के गुन्हे उत्तरप्रदेशात नोंदविले गेले.
  • महाराष्ट्र-2015- 275414, 2016 – 261714, 2017 – 288879 गुन्हे नोंदविले गेले, देशातील एकूण गुन्हय़ांपैकी महाराष्ट्र 9.4 गुन्हे नोंद झाले.
  • मध्यप्रदेश-2015 – 268714 गुन्हे, 2016 – 264412, 2017 – 269512 गुन्हे नोंद झाले, देशातील एकूण गुन्हय़ांपैकी 8.8 टक्के गुन्हे मध्यप्रदेशात.
  • केरळ-2017 मध्ये 235846 गुन्हे. सर्वाधिक गुन्हय़ांच्या यादीत चौथा.
  • दिल्ली-232066 गुन्हय़ांची नोंद. सर्वाधिक गुन्हेगारीत पाचवा क्रमांक.
  • बिहार-2017 मध्ये 180573 गुन्हय़ांची नोंद. सर्वाधिक गुन्हय़ांचया यादीत सहावा क्रमांक.
  • हुंडाबळीचे गुन्हे-उत्तरप्रदेश -2524, बिहार 1081, मध्यप्रदेश -632, पश्चिम बंगाल -499, राजस्थान -457.
  • आत्महत्येस प्रवृत्त करणे-महाराष्ट्र – 951, मध्यप्रदेश 707, आंध्रप्रदेश – 597, तेलंगणा -509, पश्चिम बंगाल – 443.
  • महिलांचे अपहरण-उत्तरप्रदेश – 14993, महाराष्ट्र -6248, बिहार -6182, आसाम – 5554, मध्यप्रदेश -5200.
  • जबरदस्तीने लग्नासाठी अपहरण-उत्तरप्रदेश – 12382, बिहार – 4777, आसाम – 3138, मध्यप्रदेश -1203, पंजाब – 795, गुजरात – 701.
  • महिलांची तस्करी-महाराष्ट्र -127, आसाम – 107, तेलंगणा -77,
  • मध्यप्रदेश – 42.
  • बलात्कार-मध्यप्रदेश -5562, उत्तरप्रदेश – 4246, राजस्थान – 3305, ओडिशा – 2070, केरळ – 2003.
  • बालिकांवरील अत्याचार-महाराष्ट्र -2385, उत्तरप्रदेश -1580, कर्नाटक – 1305, गुजरात -1233, पश्चिम बंगाल – 1188.

महिला अत्याचारातही राज्याचा दुसरा क्रमांक

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भयाकांडानंतर अनेक कठोर कायदे केंद्र सरकारने केले तरी महिला अत्याचाराचे गुन्हे कमी होताना दिसत नाहीत. 2016मध्ये देशात महिला अत्याचाराचे 338954 गुन्हे नोंदविले गेले. 2017मध्ये यात 359849पर्यंत वाढ झाली आहे.

बलात्कार, हत्या, आत्महत्या आदी गुन्हय़ांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकावर आहे. महिलांसाठी सर्वांत सुरक्षित राज्य लक्षद्वीप आहे.