साक्षीदाराला विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न

29

सामना प्रतिनिधी । जालना

शहरातील कन्हैयानगर परिसरातील वन विभागाच्या जंगलात १९ मे २०१८ रोजी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील साक्षीदार कैलास राजेंद्र दळवी यांना या प्रकरणातील आरोपींकडून जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. २८ जून रोजी या आरोपींनी कैलास यांना विष पाजून जिवे मारण्याचा प्रकार सातेफळ (ता. जाफराबाद) येथे घडला. या घटनेने जालना व सातेफळ परिसरात खळबळ उडाली आहे.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विजय बनकर हा सातेफळ गावचा पोलीसपाटील आहे. त्याला राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे कळते. विजय बनकर सोबत या बलात्कार प्रकरणात इतरही आरोपी असून, हे आरोपी साक्षीदार पैलास दळवी व फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. या धमक्यांमुळे फिर्यादी व साक्षीदार गाव सोडून इतरत्र गेले आहेत. दरम्यान, आरोपींनी विष पाजल्यामुळे साक्षीदार पैलासवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

या प्रकारामुळे साक्षीदार पैलास हा या प्रकाराने भयभीत झालेला आहे. पोलिसांनी मला न्याय दिला पाहिजे, अन्यथा या बलात्कार प्रकरणातील आरोपींना अनुपूल असे बयाण बदलून देण्याशिवाय पर्याय नाही, असे पैलासने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. पोलीस अधीक्षक, जालना यांच्याकडून मला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. कारण टेंभुर्णीचे पोलीस हे आरोपींना वाचवू पाहात असल्याचे साक्षीदार पैलास याचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या