
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर चिपळूणात पूर आला. पूराच्या पाण्याबरोबरच शहरातील दादर मोहल्ला येथील नाल्यात मगर आल्याची घटना घडली. नाल्यात निघालेली मगर पहाताच वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत मगरीला ताब्यात घेतली आणि पुन्हा नदीत सुखरुप सोडले.
नाल्यात आलेली मगर पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. पुरामुळे एका ठिकाणी अजगरही आला होता. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.


























































