राणीसावरगाव सर्कलमध्ये कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव, जनजागृतीची आवश्यकता

82

सामना प्रतिनिधी, राणी सावरगाव

कापूस या पिकांवार उत्पादनात घट निर्माण होत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. यावर्षी तर कमी पाऊसाअभावी कापसाच्या लागवडीत अडचण निर्माण झाल्या आहेत. राणी सावरगाव सर्कलअंतर्गत गाव, तांडा, वाड्या, शेत शिवारात मिली पेड (पैसा) यांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापसाच्या उगवणारी पिके नष्ट झाली आहेत. याही परस्थितीत शेती मशागतीवर मोठा खर्च करून महाघामोलाचे बी-बियाणे, खते आदी उसनवारी करून व जवळचे पैसे खर्च करताना दिसत आहेत.

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव सर्कलअंतर्गत गाव, तांडा, वाड्या, शेत शिवारात मिली पेड (पैसा) यांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर कापसाच्या उगवणाऱ्या पिक नष्ट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दुबार लागवड करण्याची वेळ आली असून यावर्षी जून मध्ये पाऊसाअभावी लागवड करता आली आहे. जून मध्ये त्या अल्प शेतकऱ्याने कापसाची लागवड केली होती. पाऊस नसल्याने त्याची वाढ खुंटली त्यानंतर जुलै मध्ये पेरणी योग्य पाऊस झाला. याच पावसावर नामवंत विविध बीटी जातीच्या कापसाची लागवड करण्यात आली. कापसाची उगवण होऊन दोन पानावर असलेला कापूस मिली पेड या जातीच्या सरपटणाऱ्या कीटकाने कापसाची पाने खाऊन फस्त केली. त्यामुळे काही शेतकऱ्याने पुनर्लागवड केली. मिली पेडचा प्रादुर्भाव झाल्याचे कळताच कृषी तालुका अधिकारी एस.व्ही. मस्के कृषि सहाय्यक मनोज दिकतवार यांनी प्रत्येक्ष काही अंश शेतकऱ्यांना भेटी देऊन निबोळी अर्क आणि कोणतेही स्पर्शजन्य कीटकनाशक पावडर वापरा असा सल्ला देऊन दोन वेळस शेतऱ्यांची कार्यशाळा भरवली. या नंतर १७ जुलै रोजी राणीसावरगाव येथे कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती दिकतवार यांनी दिली.

मिली पेड ही एक गोम प्रकाराचे सरपटणारे कीटक आहे. त्याला आपण डवचले तर गोलाकार होऊन बसते. याला मिली पेड (पैसा) असे नाव असून या किटकाने शेकऱ्याचे जुलै महिन्यातच कंबरडे मोडले आहे. आता कापसाची पुर्नलागवड केली तर उत्पादन मिळेच असा भरोसा नसल्याचे शेतकऱ्यांनी नाराजी सांगितले निसर्गाच्या लहरी पण मुळे कधी कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होईल याचा नेम उरला नाही. सतत येणारे शेतीवरच्या पिकाचे संकट म्हणजे शेतकऱ्यांचे मरण अशी अवस्था असून कृषी अधिकाऱ्याने काही मोजक्या शेतकऱ्यांना भेटी देऊन मार्गदर्शन केले म्हणजे शेतकऱ्याची पूर्तता होत नाही तर त्यांनी गाव वाड्या, तांड्या पर्यंत शेतकऱ्यांना पिकावर होणाऱ्या प्रादुर्भावर वेळेच्यावेळी मार्गदर्शन करुन कृषी सल्ला द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या