पीक विमा प्रश्नी 6 तालुक्यात बँकांसमोर शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’ आंदोलन – सचिन मुळूक

447
shivsena-with-farmer

पीक विमा वाटप प्रश्नी शेतकर्‍यांच्या वाढत्या तक्रारी घेता शिवसेनेने बँकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या (दि. 26) सोमवारी शिवसेनेच्या वतीने परळी, अंबाजोगाई, केज, माजलगाव, धारुर, वडवणी  तालुक्यातील प्रमुख बँकांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव हे देखील उपस्थित असतील, अशी माहिती जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली.

त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, दि. 26 , 27 व 28 रोजी संपर्कप्रमुख आनंद जाधव हे तीन  दिवस जिल्हा दौर्‍यावर आहेत. दि. 26 रोजी ते सकाळी 10 वाजता  माजलगाव  शहरातील 11 शाखांचे उद्घाटन करणार आहेत. अडीच वाजता त्यांच्या उपस्थित धारुरमध्ये बँकेसमोर पिक विमा संदर्भात ढोल बजाओ आंदोलन होईल. साडेपाच वाजता परळीत वैद्यनाथ मंदिरात पुजा केल्यानंतर मुक्कामी थांबतील. दुसर्‍या दिवशी दि.27 रोजी सकाळी परळी  तालुक्यातील  10 शाखांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दुपारी अडीच वाजता केज मतदारसंघातील पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. त्यानंतर ते साडेचार वाजता बीडकडे प्रयाण करतील अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या दौर्‍यासह ढोल बजाओ आंदोलनाप्रसंगी शिवसैनिक, पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या