शिवसेनेचा दणका,पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना तातडीने मिळू लागली मदत

2172
shivsena-logo-new

शिवसेनेच्या दणक्याने पीक विमा कंपन्या ताळ्यावर आल्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत पुरवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कोणत्या शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यायची आहे त्यांची माहिती या कंपन्यांनी शिवसेनेकडे मागितली आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात कंपन्यांकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ होत होती. शिवसेनेने त्याविरोधात गेल्या 6 नोव्हेंबर रोजी पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयांवर इशारा आंदोलने केली होती. शिवसेना आक्रमक झाल्याने या कंपन्यांचे धाबे दणाणले होते. पुणे येथील आंदोलनात शिवसैनिकांनी रौद्ररूप धारण केले होते.

शिवसेनेच्या इशारा आंदोलनानंतर बहुतांश पीक विमा कंपन्यांनी शिवसेना भवन येथील शिवसेना पीक विमा मदत कार्यालयात उपनेते रवींद्र मिर्लेकर यांना संपर्क साधून शेतकऱ्यांना त्वरित मदत पुरवण्याची तयारी दर्शवली.

152 कोटी पीकविम्याची रक्कम देण्याची व्यवस्था

बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने मिर्लेकर तसेच पुणे संपर्कप्रमुख सुनील (बाळा) कदम यांच्याशी चर्चा करून 7 लाख 10 हजार पात्र शेतकऱ्यांना सुमारे 152.16 कोटी इतकी पीक विम्याची रक्कम त्वरित देण्याची व्यवस्था केली. शासकीय नोंदीच्या आधारे ती रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचेही कंपनीने कळवले आहे. इतर विमा कंपन्यांनीही पात्र शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून द्यावी असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या