सोनिया गांधींच्या सुरक्षेचा सीआरपीएफने घेतला ताबा

1176

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह त्यांचे पुत्र राहुल, कन्या प्रियंका यांच्या सुरक्षेचा ताबा सोमवारी केंद्रीय राखीव पोलीस बलाने (सीआरपीएफ) घेतला. केंद्र सरकारने या गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा गेल्या आठवडय़ात काढून घेतली. त्याचवेळी या परिवाराला सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सोनिया गांधी यांच्या ‘10 जनपथ’ निवासस्थानाच्या आवारात सोमवारपासून इस्लाईली एक्स-95, एके सीरीज आणि एमपी-5 गन्स ही शस्त्र हाती घेऊन सीआरपीएफचे कमांडो तैनात झाले आहेत. अशाच प्रकारचे शस्त्र्ाधारी पथक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे तुघलक लेनवरील निवासस्थान तसेच प्रियंका गांधी-वढेरा यांच्या लोढी इस्टेटमधील निवासस्थानाच्या आवारात तैनात करण्यात आले आहे. सीआरपीएफकडे स्पेशल व्हीव्हीआयपी सिक्युरिटी युनिट असून या युनिटमधील जवानांनी गांधी परिवाराच्या सुरक्षेचा ताबा घेतला आहे. या जवानांना पुढील काही दिवस एसपीजीचे पथक मदत करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या