संभाजीनगरमध्ये 3500 फौजफाटा तैनात, 55 ठिकाणी नाकाबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासाठी एक एसआरपी, एसआरपीएफ कंपन्यांसह साडेतीन हजार कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे. 55 चौकांत नाकाबंदी करण्यात येणार असून, रात्र-दिवस गस्त ठेवण्यात येणार आहे. एका चौकात दोनशे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रथम जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसून येत असल्याने राज्य सरकारने संपूर्ण राज्यात संचारबंदीचे आदेश काढले आहेत. संभाजीनगरातदेखील पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. टवाळखोरांना रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील साडेतीन हजार कर्मचारी तर एक एसआरपी आणि एसआरपीएफ कंपनीला तैनात करण्यात आले आहे.