सायनाईड मलिका, जॉलीनंतर आता सिवा, 2 वर्षात केली 20 जणांची हत्या

1401
cyanide-siva-andhra-pradesh

देशाला हादरवणाऱ्या सायनाईड मलिका, व सायनाईड जॉली या मारेकऱ्यांनंतर आता त्यांच्याच सारख्या एका कुख्यात गुन्हेगाराला आंध्रप्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. साईनाईड सिवा असे त्याचे नाव असून त्याने 20 महिन्यात तब्बल 20 पेक्षा जास्त लोकांच्या हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिवाने देखील सायनाईड या विषाचा वापर करून लोकांची हत्या केली आहे.

आंध्रप्रदेशमधील एल्लूरू येथून पोलिसांनी वेल्लांकी सिम्हाद्री (38) याला अटक केली असून त्याने फेब्रुवारी 2019 पासून दर महिन्याला दोघांच्या हत्या केल्या आहेत. त्याने स्वत:ची आजी, मेहुणी, घर मालकीन, पुरुषोत्तम आश्रमाचे पुजारी श्री श्री राम क्रिष्णानंद यांची देखील हत्या केली आहे. सिवाला रिअल इस्टेटच्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर ते नुकसान भरून काढण्यासाठी त्याने लोकांना फसवून मारण्याचा प्लान आखला होता. त्यानुसार त्याने अनेकांना त्याच्याकडे पैसा दुप्पट करणारी जादूची नाणी,  चुंबकीय शक्ती असलेले तांदूळ असल्याचे सांगितले होते. तसेच दुर्धर आजार दूर करण्यासाठी जालिम उपाय असल्याचेही त्याने लोकांना सांगितले. त्यामुळे अनेकांनी मोहापायी सिवाकडे मदत मागितली होती. त्या लोकांना सिवाने त्यांच्याकडील पैसे व दागिने घेऊन निर्जन स्थळी बोलवायचा. तिथे पुजेचा प्रसादाच्या नावाखाली तो त्यांना सायनाईड हे विष असलेला पदार्थ खायला द्यायचा. त्यानंतर जेव्हा सायनाईडमुळे त्या व्यक्तीचा मृत्यू व्हायचा. त्यानंतर त्यांनी आणलेले दागिने व पैसे घेऊन सिवा पसार व्हायचा.

सिवाने आतापर्यंत 24 लाख रुपये व 35 तोळे सोनं चोरलं आहेत. त्या पैशातून सिवाने एलुरू येथे मोठा बंगला बांधला आहे. सिवाकडे एक यादी सापडली असून त्यात वीस जणांची नावे लिहली असून त्यातील दहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे तर इतर दहा जणांचा पोलीस शोध घेत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या