डी. वाय. पाटील अंतिम फेरीत

डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अॅकॅडमीने भारत क्रिकेट क्लबचा 87 धावांनी पराभव करत मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 6 व्या अर्जुन मढवी स्मृती महिला टी – 20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरीत त्यांचा सामना फोर्ट यंगस्टार्स क्रिकेट क्लबवर 49 धावांनी विजय मिळवणाऱया दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाशी होईल. डी. वाय. पाटील स्पोर्ट्सच्या 5 बाद 187 धावांचा पाठलाग करताना भारत क्रिकेट क्लब संघाला 8 बाद 100 धावा करता आल्या. अन्य लढतीत 2 बाद 197 धावांचा पाठलाग करणाऱया फोर्ट यंगस्टार्सला वेंगसरकर फाऊंडेशनला 148 धावांवर रोखले.