स्वागत तो करो हमारा! सलमानच्या ‘दबंग-3’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

965

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या दबंग सिरीजमधील ‘दबंग-3’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमान खानने ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. ‘चुलबुल रॉबिनहुड पांडे बरोबर 100 दिवसांनी येत आहे. स्वागत तो करो हमारा!’, असे कॅप्शन सलमानने ट्वीटला दिले आहे. मोशन पोस्टरमध्येही सलमान हाच संवाद म्हणताना दिसत आहे.

‘दबंग-3’ हा चित्रपट हिंदीसह अन्य तमिळ, तेलुगु आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह सलमानने या तीन भाषांमधील मोशन पोस्टरही शेअर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. याआधी प्रभुदेवाने सलमानसोबत वाँटेड (2009) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सलमानसह ही स्टार मंडळी दिसणार..
20 डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटानेमध्ये सलमानसह सुदीप, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रमोद खन्ना, टीनू आनंद, पंकज त्रिपाठी आणि नवाब शाह ही स्टारकास्ट दिसणार आहे. दबंग सिरीजमधील हा तिसरा चित्रपट असून 2010 ला ‘दबंग’ आणि 2012 ला ‘दबंग 2’ प्रदर्शित झाला होता. आता तब्बल 7 वर्षाने या सिरीजमधील तिसरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या