39 दिवसांच्या मुलासोबत बापाचं भयंकर कृत्य, मोडली 71 हाडं

एका विकृत बापाने आपल्या तान्हुल्याला भयंकर शिक्षा दिली आहे. त्यात त्याला 71 फ्रॅक्चर झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बापाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ही घटना इंग्लंड इथली आहे. इथल्या दक्षिण ग्लूस्टरशायर परगण्यातील वार्मली या गावात जेम्स क्लार्क नावाचा माणूस राहतो. 2017मध्ये त्याला मुलगा झाला. त्याने त्याचं नाव शॉन क्लार्क असं ठेवलं. 2018च्या जानेवारी महिन्यात एक दिवशी सकाळी शॉनच्या आईला शॉन त्याच्या खोलीतील पाळण्यात निपचित पडल्याचं दिसून आलं.

तिने घाबरत त्याला उचललं तेव्हा त्या तान्हुल्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचं तिला दिसलं. तिने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा तिथे शॉनला मृत घोषित करण्यात आलं.

या प्रकरणी पोलिसात तक्रार झाल्यानंतर शॉनच्या मृतदेहाचं विच्छेदन करण्यात आलं. त्यात आणखी एक भयंकर गोष्ट समजली. शॉनचा मृत्यू हा शरीरात 71 ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याने झाला होता.

मृत्युच्या आदल्या रात्री जेम्सच त्याला झोपवत होता. झोपवून पाळण्यात ठेवताना त्याने शॉनला इतक्या जोराने हलवलं की शॉनच्या शरीरात ठिकठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्याच्या बरगड्या मोडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जेम्सला 15 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या