दादरमधील फुटपाथ होणार चकाचक, पालिका खर्च करणार 2 कोटी 10 लाख

दादर पश्चिम, माहीम परिसरातील फुटपाथ लवकरच दर्जेदार आणि चकाचक होणार आहेत. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया या कामामध्ये सेनापती बापट मार्गाच्या फुटपाथवरील अतिक्रमणही काढण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका 2 कोटी 10 लाख रुपये खर्च करणार आहे.

मुंबईला पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक बनवण्यासाठी पालिका अनेक उपक्रम राबवत आहे. यासाठी पदपथांच्या दुरुस्तीच्या आराखडा तयार करून दर्जेदार काम करण्यात येत आहे. यामध्ये पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्यात येत असून फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. शिवाय दिव्यांगांनाही हे फुटपाथ सोयीस्कर ठरतील अशा स्वरूपात तयार करण्यात येत आहेत. याबाबतचा प्रस्ताक स्थापत्य समिती शहरच्या पटलाकर प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे.

n सेनापती बापट मार्गाकरील प्रमोद महाजन उद्यानाच्या संरक्षण भिंतीचीही डागडुजी, भिंतीचे सौंदर्यीकरण व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. माहीममध्ये लेडी जमशेद रोड, टी. एच. कटारिया मार्ग, शीव-कांद्रे जोडरस्त्याचा पदपथ, दादर येथील सेनापती बापट मार्गावरील पदपथाचे सुशोभीकरण करण्यात येईल.
n पालिकेच्या माध्यमातून चेंबूर, माटुंगा अशा किकिध भागांतील पदपथांची दुरुस्ती करण्यात येत आहे.