दादरमधील मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, रश्मी ठाकरे यांची विशेष उपस्थिती शिवकन्या संघाने पटकावले पहिले पारितोषिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वतीने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या संघांनी पारंपरिक खेळ सादर करत स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवकन्या तोडणकरवाडी, जुनी प्रभादेवी यांनी पटकावला. त्यांना पंचवीस हजार रुपये व आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच 21 पारंपरिक पोशाखातील महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

विभागप्रमुख-आमदार महेश सावंत यांच्या वतीने या मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महेश सावंत व स्मिता सावंत यांच्या हस्ते रश्मी ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, उपनेत्या विशाखा राऊत, विभाग संघटक नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेवक निशिकांत शिंदे, जोसेफ कोळी, नगरसेविका हर्षला मोरे, प्रवीण महाले, दिनेश बोभाटे, प्रवीण पंडित, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, अभिनेत्री मानसी कुलकर्णी आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून ‘लावणी क्वीन’ आकांक्षा कदम, नृत्य दिग्दर्शक पंकज पडाळे यांनी जबाबदारी सांभाळली तर खुमासदार निवेदन परेश दाभोळकर यांनी केले.