दादर कार्निव्हलची धमाल रंगणार

434

खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स, नृत्य-संगीत, टॅलेंट दाखवायला खुला मंच, स्पर्धा, फॅशन शो, शिबीर आणि भरपूर धम्माल असलेल्या दादर कार्निव्हलचे पडघम वाजले आहेत. यंदाचा दादर कार्निव्हल 21 आणि 22 डिसेंबरला  शिवाजी पार्क येथील म्युनिसिपल जिमखाना येथे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत रंगणार आहे.

दादर कार्निव्हलची संकल्पना युवा उद्योजिका मनाली कामत यांची आहे. याविषयी मनाली सांगतात, मुळात दादरमध्ये प्रचंड उत्साह, कलागुण आहेत. पण या सगळय़ाला एकत्र आणेल आणि त्याचा आनंद इतरांना मिळेल असे व्यासपीठ नव्हते ते यानिमित्ताने द्यायचा प्रयत्न आम्ही केलाय. स्वत:चे वेगळेपण जपणारा महोत्सव दादरमध्ये असावा असे मला वाटत होते. त्यातूनच दादर कार्निव्हल ही संकल्पना जन्माला आली. यंदाच्या कार्निवलमध्ये अधिक करमणुकीची भर घातली आहे. प्रवेश शुल्क नसल्याने लहानांपासून मोठय़ांना कार्निव्हलमध्ये धमाल करायला मिळेल.

कार्निव्हलचे वैशिष्टय़ म्हणजे मेघना एरंडे, सविता मालपेकर, सीमा देशमुख, मंगल केंकरे आदी कलाकार त्यांचे स्टॉल्स चालवताना दिसतील. कुणाच्या स्टॉलवर हस्त व्यवसायाचे नमुने तर कुणाच्या स्टॉलवर खास त्यांच्या हातच्या मेजवानीची चव चाखता येईल.

कार्निव्हलमध्ये शाकाहारी, मांसाहारी आणि विविध डेझटर्सची खाद्यजत्रा, घरगुती आणि लघुउद्योजकांचे स्टॉल्स, मुले आणि मोठय़ांसाठी अनोख्या स्पर्धा, कराओकेवर गाण्याचा खुला मंच, सेलेब्रिटी मुलाखती आणि गप्पा, झुंबा आणि अन्य नृत्यांची संधी, मुलांसाठी खास शिबिरे, खुली फोटोग्राफी स्पर्धा, फॅशन शो, लाइव्ह म्युझिक, ग्रीन प्रोजेक्ट  झाडे लावण्याची अनोखी संकल्पना, टॅलेंट हंट, सेल्फी बुथ आणि भरपूर बक्षिसे असतील.

आपली प्रतिक्रिया द्या