दहिसर चेकनाका येथील वाहतूककोंडी दूर, हनुमान नगरजवळील रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी

दहिसर चेकनाका येथील वाहतूककोंडीची समस्या लवकरच दूर होणार आहे. दहिसर पूर्वेतील प्रभाग क्रमांक 3 केतकीपाडा येथील हनुमान नगरजवळील नियोजित रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम अखेर मार्गी लागले आहे.

स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे काम आता मार्गी लागणार आहे. सदर रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱया निवासी झोपडीधारकांना मीरा रोड येथे सदनिका देण्यात आल्या आहेत. तसेच बाधित होणाऱ्या गाळेधारकांना मार्पेटमध्ये उपलब्ध असलेल्या गाळ्यात जागा देण्यात येणार आहे.

रस्ता रुंदीकरणाचे काम झाल्यामुळे मुंबईतील प्रवेशद्वार व चेकनाकामधील वाहतूककोंडी बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. आर-उत्तर दहिसर कार्यालयात सहाय्यक आयुक्त सध्या नांदेडकर, अभियंता राजरत्न नवघरे यांच्या उपस्थितीत रस्त्यालगतची सर्व घरे पाडून रस्ता रुंदीकरण करण्यासाठी सुरुवात झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या