दहिसरमध्ये 34 वर्षांपूर्वीच्या अतिक्रमणांवर बुलडोझर! 10 बांधकामे जमीनदोस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर पूर्व स्टेशनलगत गेल्या 34 वर्षांपासून असणाऱया 10 मोठ्या अतिक्रमणांवर पालिकेने आज धडक कारवाई करीत बुलडोझर फिरवला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईमुळे ‘आर-उत्तर’ विभागातील स्टेशनलगतच्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

दहिसर पूर्व स्टेशनलगतच्या तावडे मार्गावर 1985 पासून ही अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे होती. या बांधकामांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता. मात्र या बेकायदा बांधकामांमुळे दहिसर स्थानकाशेजारील वाहतुकीला अडथळा येत होता. वाहतूककोंडी होत होती. याबाबत पालिकेकडे अनेक तक्रारीदेखील दाखल झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उपायुक्त विश्वास शंकरकार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्या नेतृत्कात ‘आर-उत्तर’ विभागाने ही धडक कारवाई केली. या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे 45 कर्मचारी घटनास्थळी तैनात होते तर महापालिकेचे 35 कामगार – कर्मचारी व अधिकारीदेखील घटनास्थळी कार्यरत असल्याची माहिती सहायक आयुक्त नांदेडकर यांनी दिली.