22वी दहिसर मिनिथॉन रविवारी

369

दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन आणि व्हीपीएम स्पोर्टस् क्लब यांनी मुंबई उपनगरचे दिवंगत सचिव कॉसमॉस परेरा यांच्या स्मरणार्थ आयोजिलेली 22वी दहिसर मिनिथॉन 2019 ही रस्ते शर्यत रविवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता दहिसर पूर्व येथे पार पडणार आहे. या उपक्रमाला मुंबई उपनगर जिल्हा ऍथलेटिक्स संघटनेची मान्यता मिळाली आहे. रोटरी क्लब, सुधींद्रनगर, दहिसर पूर्व येथे सुरू होणाऱया या मिनिथॉनमध्ये 16 वर्षांखालील मुले (5 किमी ), मुली (3 किमी); 14 वर्षांखालील मुले (3 किमी ), मुली (3 किमी ) :- 12 वर्षांखालील मुले (2 किमी ), मुली (2 किमी ) अशा विविध गटांचा समावेश करण्यात आला आहे. या मिनिथॉनमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱया धावपटूंनी दहिसर स्पोर्टस् क्लबचे सचिव हिरेन जोशी यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या