
राजस्थानच्या जैसलमेर जिह्यात गाढव चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित युवकांना मारहाण झाल्याची आणखी एक घटना घडली. यापूर्वी अन्य दोन घटनांत दलितांना मारहाण केली होती. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल साइटस्वर व्हायरल झाल्यावर 5 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली असून तीनजणांना ताब्यात घेतले आहे. जैसलमेर जिह्यातील फतेहगड तालुक्यातील रामा गावात 15फेब्रुवारी रोजी दलित युवकांना मारहाण झाली होती. सुमारे 10 ते 12 जणांनी तीन दलित युवकांनी गाढव चोरल्याचा आरोप करीत लाथाबुक्क्यांनी आणि काठय़ांनी बेदम मारहाण केली होती.




























































