मुंबईतील सफाई कर्मचाऱ्याच्या नृत्यावर झाले सारेच फिदा!

तुमच्यात टॅलेंट असेल तर ते कधीच लपत नाही असं म्हणतात. सोशल मीडियावर सध्या मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या राहुल सोळंकी या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. उदरनिर्वाहासाठी वडिलांसोबत साफसफाईची काम करणाऱ्या राहुलची निवड ‘डान्स दीवाने’ या रिऑलिटी शोमध्ये झाली आहे. त्याच्या नृत्यकौशल्यावर परीक्षक फिदा झाले आहेत.

कलर्स हिंदीवर डान्स दीवाने चा तिसरा सीजन सुरू झाला आहे. त्यात देशभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. नुकताच वाहिनीतर्फे एक प्रोमो रिलीज करण्यात आलाय. यामध्ये मुंबईतील चाळीत साफसफाईची कामे करणाऱ्या राहुलची कहाणी दाखवण्यात आलीय. राहुल हा वडिलांसोबत दररोज आठ चाळीतील कचरा गोळा करतो. त्यानंतर 50 हून अधिक सार्वजनिक शौचालयांची सफाई करतो.

वडील साफसफाईसाठी नाल्यात उतरतात हे आपल्याला आवडत नाही. आपल्या कुटुंबाला मोठय़ा घरात घेऊन जाण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. त्याची ही विदारक कहाणी ऐकून माधुरी दीक्षीत आणि धर्मेश येलांडे हे परीक्षक भावुक झाले. यावेळी धर्मेशने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपणही गरीब पुटुंबातून संघर्ष करुन इथवर पोहचल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या