जिनपिंग यांनीही ‘दंगल’ पाहिला

641

हरयाणात विधानसभा निवडणुकीची दंगल सुरू असतानाच ‘दंगल’ गर्ल बबिता फोगटच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दंगल’ची आठवण काढली आहे. आमीर खानचा हा सिनेमा बबिता आणि तिच्या वडिलांच्या कुस्ती प्रवासावर आधारलेला आहे. मोदी यांनी प्रचारसभेत भाषण करताना ‘दंगल’ हा सिनेमा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही तो पाहिल्याचे आणि त्यांना आवडल्याचे सांगितले आणि बबितासाठी मते मागितली.

बबिता फोगट ही 29 वर्षीय कुस्तीपटू हरयाणा विधानसभा निवडणुकीत दादरी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर काँग्रेसच्या निरपेंदर सिंह सांगवान आणि जननायक जनता पार्टीच्या सतपाल सांगवान यांच्या विरोधात लढणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या