दापोलीत चार वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार

817

चार वर्षाच्या चिमुरडीला चॉकलेट खायला देतो असं सांगून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सुरेश कुंबेटे नामक नराधमाला दापोली पोलिसांनी अटक केली असून. बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घृणास्पद घटनेमुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून सुरेश या निरपराध चार वर्षीय चिमुरडीला चक्क तिच्या आजी समोरच उचलून घेऊन आपल्या घरात गेला. पीडितेच्या आजीला या नराधमाच्या हेतूची जराही शंका आली नाही. परंतु बराच वेळ नात घरी न आल्याने आजीने आवाज दिल्यावर त्या चिमुकलीला या नराधमाने घरी पाठवले व तो बाहेर निघून गेला. चिमुरडी घरी आल्यावर घडला प्रकार तिने आजीला सांगितला. हा प्रकार ऐकून आजीला धक्काच बसला. संतापलेल्या आजीने तिला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

या प्रकरणी आरोपी नराधमाला कठोर शिक्षा होण्यासाठी आजीने फिर्याद दिली आहे. भात लावणीचे दिवस असल्याने त्या चिमुरडीचे आई,वडील शेतात गेले होते. तिची आजी तिच्यासोबत घरी होती. याचाच फायदा घेत त्या नराधमाने त्या चिमुरडीवर अत्याचार केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे

आपली प्रतिक्रिया द्या