दापोलीतील लाडघरच्या शोभायात्रेतील वेशभूषा ठरल्या आकर्षक

नवीन वर्षाच्या शुभारंभाला अर्थातच गुढीपाडवा या शुभदिनी लाडघर ग्रामस्थांनी काढलेली शोभायात्रा अखंड तालूक्यात आकर्षक ठरली. दापोली तालूक्यातील लाडघर येथील ग्रामस्थांनी गुढी पाडव्याला काढलेल्या शोभा यात्रेत जि. प. पू. प्रा. मराठी लाडघर शाळा नंबर 2 या शाळेमधील विदयार्थ्यांनी राम लक्ष्मण सीता यांची जोडी, हनुमान, वानरसेना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, झाशीची राणी, हिंदुस्थानी जवान, पोलीस, डॉक्टर, परिचारिका, महात्मा गांधी, वासुदेव, सुभाषचंद्र बोस यांसारख्या विविध थोर पुरुषांसह देव देवतांच्या साकारलेल्या वेगवेगळया वेशभूषा खरंच लक्षवेधी ठरल्या. विशेष म्हणजे या शोभायात्रेत बेंजो किंवा डीजे वादयाला थारा नव्हता तर पारंपारिक खालुबाजाच्या सुरेल वादयाच्या तालावर महिलांनी लेझीम हाती घेत थिरकण्याचा आनंद घेतला त्यात पुरूष सामिल झाल्याने शोभायात्रेची आणखीनच रंगत वाढली. आणि उपस्थित अबालवृध्दांचा आनंद अधिकच व्दिगुणित झाला.

ही शोभायात्रा सकाळी 9 वाजता लाडघर येथील श्राणेपासून पासून शोभयात्रेला सुरुवात करण्यात आलेली. ही शोभायात्रा लाडघर गावातील श्राणेवाडी, पार्थादेवीवाडी, शंकरवाडी आदी वाड्यांमधून पुढे ग्रामदेवता चंडिका देवीच्या मंदिरात या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रामध्ये अश्वावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज व वारकरी सांप्रदायाच्या दिंडीचे दृष्य डोळे खिळवून ठेवणारे असेच होते. त्यामुळे शिवकालीन इतिहासाला चालना मिळाली तसेच सांप्रदायाच्या दिंडीने संत परंपरंाही प्रत्यक्ष अवतरलेली दृष्यातून पाहावयाला मिळाले. या शोभायात्रेतील महिलांच्या उस्र्फुत अशा सहभागाने शोभायात्रेचा उत्साह अधिक वाढलेला पाहायला मिळाला

अतिशय शिस्तबध्द पध्दतीने ही शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेचे 2 रे वर्ष असून येणा-या पुढील पिढीला हिंदू धर्मांच्या सण उत्सवांचे महत्व समजावे. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण कमी होऊन हिंदु संस्कृती जोपासण्याची मनी आवड निर्माण व्हावी तसेच आपल्या हिंदू धर्माचा इतिहास कळावा व त्याचे आचरण व्हावे हेच या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ठ होते. असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील महिला पुरुष व युवकांनी विशेष मेहनत घेत कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी केला.