
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीवर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली संवर्धन प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण झाली. आज गर्भगृहाची स्वच्छता करण्यात आल्याने तिसऱ्या दिवशीही भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घ्यावे लागले.
दरम्यान, उद्या (दि. 14) सकाळी देवीचा प्राणतत्व पुनर्प्रतिष्ठापितसह सर्व धार्मिक विधी श्रीपूजकांकडून पूर्ण झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मुख्य मूर्तीचे दर्शन पूर्ववत खुले करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.