
>> निळकंठ कुलकर्णी
।। श्री गुरुदेव दत्त ।।
श्रीदत्तप्रभूंनी पद्मासन स्थित मूर्ती आहे कर्दम मुनींचा आश्रम आहे. त्रेतायुगात मार्गशीर्ष पौर्णिमाच्या भर माध्यान्ही महर्षी अत्रि आणि महापतिव्रता साध्वी अनसूया यांच्या सुपुत्र रूपाने भगवान श्री दत्तात्रेयांनी अवतार धारण केला. ब्रह्मदेवाच्या चार मानस पुत्रांपैकी महर्षी भृगू हे ज्येष्ठ पुत्र दुसरे महर्षी अंगिरस तिसरे महर्षी आणि चौथे महर्षी वैखानस! महर्षी अत्रि आणि महर्षी अंगिरस यांना मनाचं स्थान थेट सप्तर्षीमधेही आहे.
साक्षात श्रीलक्ष्मीमातेचे पुत्र असलेल्या कर्दममुनी आणि देवाहुती यांची सुकन्या म्हणजेच महर्षी अत्रिचीं पत्नी महासाध्वी माता अनसुया! अत्रीमुनींच ज्ञाना तप सामर्थ्य आणि वैराग्य पाहून कर्दममुनी देवाहुतीही त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या अनसुया या सौंदर्यवती – सुशील कन्येचा आणि अत्रि मुनिशी विवाह लावून दिला. ‘अनसूया म्हणजे ‘ असुयारहित!
अशा या महान सती श्री अनसूयेचे माहेर अर्थात श्रीदत्तप्रभूंच आजोळ (महर्षी कर्दममुनींचा आश्रम) आहे. दंडकारण्याचा अतिशय रम्य परिसर असलेल्या दिंडोरीजवळ ‘करंजी’ या गावी अगदी भर नाशिक वणी मार्गावर! वणीकडे जाताना डाव्या बाजूला मुख्य रस्त्यापासून केवळ 3 – 4 किमी आता हे पवित्र स्थान आहे. यालाच ‘निर्जल मठ’ असेही म्हणतात याच परिसरात पराशर, मार्कंडेय , कवण्या तपस्वी महर्षीचे ही आश्रम होते.
साक्षात श्रीकृष्णानं ज्याचं वर्णन ‘ सिद्धांना कपिलो मुनी; असं केलंय. त्या कपिलोमुनींनी या स्थानी तपश्चर्या केली आहे. श्रीदत्तप्रभूंची पद्मासन स्थित मूर्ती अन्य कोठेही पाहायला मिळतं नाही व एकमेव हिंदुस्थानामधून इथे पाहायला मूर्ती मिळते. प्रत्यक्ष गंगामाईनं श्रीदत्तप्रभूंची ही मूर्ती तप केलेल्या श्री शिवदयाळ स्वामींना प्रसाद दिलेली आहे. मंदिरात असलेल्या देवघरात केंद्रस्थानी जेम तेम एक उंचीची ही पांढरी शुभ्र मूर्ती ठेवलेली आहे.