नीरा नदीत उडी मारलेल्याचा मृतदेह सापडला

 सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या सारोळा येथील पुलावरून उडी टाकून आत्महत्या केलेल्या कराड तालुक्यातील ओगलेवाडीच्या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास सारोळा पुलापासून जवळपास 15 किलोमीटर अंतरावर प्रवाहामध्ये मिळून आला.

नीलेश महादेव काकडे (वय 40, रा. ओगलेवाडी, ता. कराड) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी नीरा नदीच्या पुलावर आपली दुचाकी लावून त्याने नदीपात्रात उडी घेतली होती. पुलावर मिळालेल्या गाडीवरून संबंधिताने नदीत आत्महत्या केली असावी, असा तर्क करून त्यानुसार शोधमोहिमेला गती देण्यात आली होती.

महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँण्ड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर, शिरकळ रेस्क्यू टीम यांच्याकडून शोधमोहीम सुरू होती. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुलापासून पुढे जकळपास 15 किलोमीटर अंतरावर राजापूर स्मशानभूमीजवळ नदीच्या प्रवाहात नीलेश काकडेचा मृतदेह मिळाला.