
उत्तर प्रदेशमध्ये एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचली असून तपास सुरू आहे.
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी सुटकेस पडली होती. काही लोकांनी पाहिले असता त्यातून केस बाहेर पडलेले दिसत होते. तसेच सुटकेसवर रक्ताचे डागही होती. उपस्थित नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सुटकेस उघडून पाहिली तेव्हा त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला. तिच्या हातला मेहंदी लागली होती. त्यामुळे तिचे नुकतेच लग्न झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तिच्या चेहर्यावर मारहाणीच्या खुणा दिसत होत्या. मृत तरुणीचे वय 22-23 असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

























































