
सामना प्रतिनिधी । उरण
उरणच्या किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या १० फुट लांबींच्या डॉल्फिनचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दफन केले.
उरण तालुक्यातील केगाव समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी १० फुट लांबीचा मृत डॉल्फीन मासा सापडला होता. सडलेल्या अवस्थेतील डॉल्फिनची शारीरिक तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. तपासणीनंतर डॉल्फिन माशाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याची माहिती उरण उपवन सरंक्षक अधिकारी शशांक कदम यांनी दिली. वन विभागाने मृत माशाचे किनाऱ्यावरच दफन केल्याचेही कदम यांनी सांगितले.




























































