आयस्क्रिममध्ये बोट सापडल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हर्षेसच्या चॉकलेट सिरपमध्ये मेलेला उंदीर सापडला आहे. हा उंदीर सिरपच्या सिलबंद बाटली उघडल्यावर सापडला आहे. एका महिलेने याबाबतचा इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे, एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला असून तिने दावा केला आहे की, हर्षेसच्या चॉकलेट सिरपच्या सीलबंद बाटलीत एक मेलेला उंदीर सापडला आहे. आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये प्रामी नावाच्या एका यूजरने लिहीले आहे की, मी झेप्टोवरुन ऑर्डर केलेल्या सामानामध्ये एक धक्कादायक गोष्ट मिळाली. हे सर्वांच्या माहितीसाठी आणि सावधतेसाठी पोस्ट करत आहे. त्यानंतर ती बंद झाकण खोलून सीरप एका कपमध्ये ओतते. यामध्ये तिला मेलेला उंदीर सापडला आहे. इंस्टा त्यांच्या कुटुंबातील कोणीतरी त्यावर पाणी ओतते.
महिलेने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आम्ही ब्राऊनी केकसोबत झेप्टोवरुन हर्षेस चॉकलेट सिरपची ऑर्डर केली होती. त्यानंतर ते सिरप खोलले आणि डिस्पोजल ग्लासात ते सिरप ओतले. त्यावेळी त्यात मेलेले उंदीर दिसला. तो नेमका उंदीरच आहे की दुसरं काही हे आणखी जाणण्यासाठी त्यावर पाणी ओतले त्यावेळी खात्री झाली की तो मेलेला उंदीर आहे.
View this post on Instagram
चॉकलेट सीरप कंपनी हर्षेसने महिलेच्या पोस्टवर रिप्लाय केला आहे. ती म्हणाली, आम्हाला हे पाहून फार दु:ख झाले, कृपया आम्हाला त्या बाटलीचा यूपीसी आणि मॅन्यूफॅक्चरींग कोड [email protected] यावर रेफरेंस नंबर 11082163 सोबत पाठवा. म्हणजे आमच्या टीमचा सदस्य तुमची मदत करू शकेल.