
ब्रम्हपुरी, नागभिड वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोडाझरी अभयारण्यात पूर्ण वाढ झालेला वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. वाघाच्या शरीरावर जखमा आढळ्या आहेत. त्यामुळे दोन वाघाच्या झुंजीत वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. ही घटना घोडाझरी जंगलातील बफर क्षेत्रातील हुमा बिटातीळ येथे ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटना स्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा सुरू आहे.



























































