
आयकर विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आयकर भरणा करण्याची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 31 जुलै 2025 रोजी किंवा त्यापूर्वी आयटीआयर साधर करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एखाद्या करदात्याला काही अडचणींमुळे 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी आयकर भरणा करता आला नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण दिलेल्या मुदतीनंतरही करभरणा करता येईल. तसेच त्यासाठी विलंब शुल्कही लागणार नाही. दरम्यान, 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयकर भरणा करण्यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असणार आहे.