
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱयांच्या पाठोपाठ निवृत्त कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याचा आदेश सोमवारी काढण्यात आला. साधारण तीन टक्क्यांनी ही वाढ लागू होणार असून जानेवारी 2019 पासून थकबाकीसह भत्तावाढीची रक्कम मिळणार आहे. सात लाख निवृत्तीवेतनाधारकांना याचा लाभ होईल.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱयांसोबत सरकारी कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्यावेळी केंद्राप्रमाणे राज्यात 5 दिवसांचा आठवडा करणे, वेतनत्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहकाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, महिला कर्मचाऱयांसाठी 2 वर्षांची बालसंगोपन रजा, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे, अधिकाऱयांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुकिधा लागू करणे अशा विविध 18 मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.


























































