महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

835
crime

शहरातील आडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल मनीषा गोसावी (35) यांचा रविवारी सकाळी नांदूर नाका परिसरात मृतदेह आढळला. या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आडगाव पोलीस ठाण्यात मनीषा गोसावी ह्या कार्यरत होत्या. एक महिन्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱयाने त्यांना शिवीगाळ केल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली होती. याप्रकरणी गोसावी आणि संबंधित अधिकाऱयाची पोलीस उपायुक्तांकडून चौकशी सुरू होती. शिवीगाळ झाल्याच्या घटनेपासून त्या तणावाखाली होत्या. काही दिवस त्या रजेवरही होत्या. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास नांदुर नाका पोलीस चौकीजवळ रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळला. मृत्यूचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना कुठलीही माहिती देवू नये, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी आडगाव पोलिसांना दिल्याने या घटनेच्या संशयाचे गूढ अधिक गडद झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या