भाजप नेत्याकडून जीवे मारण्याची धमकी, अखिलेश यादव यांचा आरोप

432

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष  आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप नेत्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कन्नौजमध्ये त्याच नेत्याने एका तरुणाला पाठवून कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, तुम्हालाही कन्नौजमध्ये कार्यक्रम करू देणार नाही, असा इशारा अखिलेश यांनी या वेळी दिला.

अखिलेश यादव यांचे शनिवारी कन्नौज येथील एका कार्यक्रमात भाषण सुरू होते. ते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करीत होते. याचवेळी एका तरुणाने मंचावर धाव घेतली आणि आपण सत्तेत आलात तर काय करणार, असा जाब विचारला. पोलिसांदेखत हा प्रकार घडल्याने अखिलेश यांनी बंदोबस्तावरील पोलिसांना फैलावर घेतले होते. नंतर समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला बेदम चोपले होते. त्या तरुणाने ‘जय श्रीराम’चा नाराही दिला होता. तरुणाच्या घुसखोरीबाबत अखिलेश यांनी रविवारी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधला. भाजप नेत्याने मला पाठवलेला धमकीचा मेजेस मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवला आहे, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र त्यांनी भाजप नेत्याचे नाव उघड केले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या