दिपक केसरकर यांनी घेतलं चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन

28

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये गणेशोत्सवची धुम सुरू असून देश-विदेशातून लाखो भाविक प्रत्येक वर्षी येथे दर्शनासाठी येत असतात. यासह अनेक सेलिब्रिटी आणि नेते मंडळीही बाप्पा चरणी लिन होताना दिसत आहेत. शुक्रवारी ‘माझ्या ध्यानी मनी चिंचपोकळीचा चिंतामणी’ असं म्हणत राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष भालचंद्र (भावेश) शां. परब यांनी त्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

चिंचपोकळीच्या चिंतामणीची शतकमहोत्सवाकडे वाटचाल सुरू असून यंदाचे 99 वे वर्ष आहे. या निमित्ताने मंडळाने एका विशेष लोगोचेही अनावरण केले आहे. याबाबत बोलताना उपाध्यक्ष परब काय म्हणाले ऐका…

आपली प्रतिक्रिया द्या