Deepavali ‘व्यास क्रिएशन्स्’चे तीन दिवाळी अंक प्रकाशित; स्वदेशी जागर, आरोग्यम्, पासबुक आनंदाचे

deepavali

दिवाळी अंक म्हणजे मराठी सारस्वतांचं गौरीशंकर. ही 111 वर्षांची परंपरा अखंडित रहावी, आणि या वाचन चळवळीत आपलाही सहभाग असावा या उद्देशाने गेली पंधरा वर्षे व्यास क्रिएशन्सतर्फे तीन दिवाळी अंक प्रकाशित केले. यंदाही ही परंपरा अबाधित ठेवत तीन अंक प्रकाशित करण्यात आले आहे.

प्रतिभा दीपोत्सवाचा विषय: स्वदेशी जागर – अभिमान स्वदेशी आत्मभान स्वदेशी

स्वदेशी विचारधारा ही या अंकाची मध्यवर्ती थीम आहे. आजारापासून, रोगापासून दूर राहायचे असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती अर्थात व्याधीक्षमत्व उत्तम राखणे आवश्यक आहे याची आयुर्वेदशास्त्रीय चर्चा आरोग्यम दिवाळी अंकाच्या व्याधीक्षमत्व या विशेषांकातून केली आहे. तर ग्राहकांनी स्मार्ट गुंतवणूक कशी करावी, गुंतवणूककीचे फायदे, सोपे पर्याय आणि सध्याची एकूणच अर्थव्यवस्था यावर चर्चा आणि माहिती यंदाच्या पासबुक आनंदाचे अंकाच्या स्मार्ट गुंतवणूक विशेषांकातून केली आहे. वाचकांना माहिती मनोरंजनासह सजग करण्याचा प्रयत्न व्यास क्रिएशनकडून करण्यात आला आहे.

थोडक्यात माहिती

व्यास दीपोत्सव 2020

1. प्रतिभा दीपोत्सव – स्वदेशीजागर – अभिमान स्वदेशी आत्मभान स्वदेशी

2. स्मार्ट गुंतवणुकीचे शास्त्र समजवणारा पासबुक आनंदाचे- स्मार्ट गुंतवणुक विशेषांक

3. स्वास्थ्यपूर्ण आयुष्याचा मूलमंत्र देणारा आरोग्यम् चा व्याधिक्षमत्व विशेषांक

साहित्य आणि प्रकाशनाच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे सातत्याने नवनवीन कल्पनाचा अंगीकार करत दिवाळी अंकांच्या परंपरेत ठाण्याच्या व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्थेने मोलाची भर घातली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही तीन दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत.

स्वदेशी विचार जागवणारा स्वदेशीजागर ( प्रतिभा दीपोत्सव विशेषांक )

हिंदुस्थानला गौरवशाली संस्कृती आणि परंपरा लाभली आहे. हिंदुस्थानची स्वदेशी ही जीवनतत्वज्ञान प्रणाली आहे. स्वदेशी हा आपला धर्म असला पाहिजे, तो आपला जीवनप्रवाह असला पाहिजे ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन प्रतिभा दिवाळी अंकाचा स्वदेशीजागर विशेषांक प्रकाशित केला आहे. आत्मनिर्भर विचारयात्रेच्या प्रवाहात स्वदेशी विचारांचा आग्रह अशी अंकाची मांडणी आहे. स्वदेशी संस्कृती आणि परंपरा, स्वदेशी सभ्यता, स्वदेशी विचारांचे सप्तर्षी, इतिहास, स्वदेशी हिंदुस्थानचा व्यापार, आत्मनिर्भर हिंदुस्थानसाठी विचारमंथन अशा विभागवार विषयांसाठी महाराष्ट्रातील विचारवंत प्रा. अविनाश कोल्हे, रवींद्र महाजन, शैलेन्द्र देवळाणकर, अरुण करमरकर, डॉ. अशोक चौसाळकर, सिद्धराम पाटील, तुकाराम चिंचणीकर, डॉ. नागेश टेकाळे, अनय जोगळेकर, वासुदेव कुलकर्णी, जयश्री देसाई, आदि लेखक विचारवंत यांचे लेख विशेष आहेत. याचबरोबर स्वदेशी विचारांच्या संस्था परिचय, स्वदेशी वस्तूंची अधिकृत यादी, रंजक आणि माहितीपूर्ण साहित्य यांनी अंक सजला आहे.

संपादक – श्री. वा. नेर्लेकर
मूल्य – 400/-

स्मार्ट गुंतवणुकीचे शास्त्र समजवणारा : स्मार्ट गुंतवणुक विशेषांक (पासबुक आनंदाचे )

केवळ बँकिंग या विषयाला वाहिलेला पासबुक आनंदाचे हा दिवाळी विशेषांक व्यास क्रिएशन्स गेली सात वर्षे सातत्याने प्रकाशित करीत आहे. यंदाचा विषय आहे स्मार्ट गुंतवणूक! गुंतवणूक हे आपल्या अर्थजीवनातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. गुंतवणुकीचे महत्त्व, गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय, स्मार्ट गुंतवणूक कशी करायची याचे सखोल मार्गदर्शन यंदाच्या अंकात केले आहे. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर बदलती अर्थव्यवस्था, बदलते धोरण, कोरोना योध्याचे मनोगत हे यंदाच्या अंकाचे विशेष आकर्षण आहे! बँकिंग विषयातील मान्यवर तज्ञ अभिजित फडणीस, सुधाकर अत्रे, चंद्रशेखर ठाकूर, चित्रा उबाळे, अविनाश जोशी, शशिकांत जाधव, शिरीष पोळेकर आदि लेखकांचे लेख वाचनीय आहेत.

संपादक – नीलेश गायकवाड
मूल्य – 200/-

स्वास्थ्यपूर्ण आयुष्याचा मूलमंत्र देणारा व्याधिक्षमत्व विशेषांक (आरोग्यम्)

कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्येक व्यक्तीचे स्वास्थ्य, त्याचे व्याधिक्षमत्व (immunity) याबद्दलचे महत्व अधिक वाढले आहे. गूगल आणि whatsapp विद्यापीठातील पदवीधर नेहमीच आपल्याला नवनवीन उपाय सुचवत असतात. परंतु खुद्द वैद्यकीय पेशातील तज्ञ त्यांचे याविषयावरील वक्तव्य काय आहे, त्यांचे मत विचार काय आहेत, आहे; यासर्वाची आयुर्वेदशास्त्रीय चर्चा यंदाच्या आरोग्यम दिवाळी अंकाच्या व्याधिक्षमत्व या विशेषांकातून केली आहे. व्याधी होतो म्हणजे नक्की शरीरात काय बदल घडतो? व्याधीक्षमत्व म्हणजे काय? देश, काल, ऋतू, व्यक्ती यांवर ते कसे आधारीत आहे? कर्करोग, आमवात यासारख्या रोगप्रतिकारशक्ती कमी करणा-या आजारात रोग्याने काय करावे, स्वत:चे स्वास्थ्य कसे सांभाळावे, टिकवावे? हृदय रोगी, मधुमेही यांनी कोणती काळजी घ्यावी? ज्येष्ठमंडळींनी काय दक्षता घ्यावी? निरोगी आयुष्याचा मूलमंत्र काय आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांवर डॉक्टर, वैद्यगण माहिती देत आहेत.

डॉ.उल्हास कोल्हटकर, डॉ.अविनाश भोंडवे, डॉ. अद्वैत पाध्ये, वैद्य सुविनय दामले, वैद्य सचिन उत्पात, वैद्य ऊर्मिला पिटकर आदि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचे अभ्यासपूर्ण लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. वैद्य सुचित्रा कुलकर्णी या विशेषांकाच्या संपादिका आहेत.
मूल्य – 200/-

संपर्कासाठी –

व्यास क्रिएशन्स्
डी-4, सामंत ब्लोक्स, श्री घंटाळी देवी मंदिर पथ,
नौपाडा, ठाणे (प.) 400 602.
दूरध्वनी : 25447038/ 9967839510
Email : [email protected]
Facebook : www.facebook.com/joinvyascreations

आपली प्रतिक्रिया द्या