ठरल हो ठरलं ! बाजीराव-मस्तानी इथे होणार विवाहबद्ध

12

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाविषयी खूप उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. रणवीर आणि दीपिका या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार असून त्याची तारीख आणि स्थळ निश्चित झाल्याची चर्चा होत आहे.

फिल्मफेअर या बेवसाईटने या दोघांच्याही लग्नाबाबत वृत्त प्रसारित केलं आहे. या दोघांचं लग्नं इटलीतील लेक कोमो येथे २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लग्नाला मोजके ३० पाहुणेच उपस्थित असणार असल्यांचही या वृत्तात म्हटलं आहे. दीपिकाला इटली हे शहर आवडत असल्याने त्यांनी इटलीत विवाह करण्याचं निश्चित केलं आहे. त्या दोघांपैकी कुणीही याबाबत अजून अधिकृत खुलासा केलेला नाही. पण, अभिनेते कबीर बेदी यांनी ट्वीट करून दिलेल्या शुभेच्छांमुळे हे लग्न जवळपास ठरल्यात जमा असल्याचंही बोललं जात आहे. या लग्नानंतर मुंबई येथे ग्रँड रिसेप्शनही ठेवण्यात आलं आहे.

दीपिका आणि रणवीर यांनी आपलं नातं कधीच जाहीररित्या मान्य केलेलं नाही. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही आजवर रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या